logo

खंडेराजुरी तालुका मिरज येथील ग्रामसभेत गावातील सर्वच गौण खनिज उत्खनन बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे. खंडेराजुरी ता

खंडेराजुरी तालुका मिरज येथील ग्रामसभेत गावातील सर्वच गौण खनिज उत्खनन बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

खंडेराजुरी ता. मिरज येथे गेल्या तीन वर्षापासून गौण खनिज उत्खननाचा सपाटाच लावला आहे. दररोज किमान 250 ते 300 डंपरचे उत्खनन नियमितपणे खंडेराजुरीतून होत आहे. सदर डंपरची वाहतूक ही जास्तीत जास्त खेपा व्हाव्या या उद्देशाने चालकाकडून भरधाव वेगाने केली जात असल्याने वारंवार गावात अपघात घडत आहेत. मध्यंतरी एका मुलाला कायमस्वरूपी अपंगत्वही आले आहे. भरधाव व अवजड वाहतूक झाल्याने खंडेराजुरी ते मिरज व खंडेराजुरी ते एरंडोली रस्त्याची अक्षरशा चाळण झाली असून ना पोलीस, ना परिवहन विभागाने याकडे लक्ष दिले. याबाबत खंडेराजुरी येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीपर्यंत परिवहन विभागाशी संपर्क साधला असता नेहमीच्या भाषेत "कारवाई करतोय" एवढेच उत्तर मिळाले. गेल्या आठ दिवसात प्रत्यक्षात कारवाई काही झाली नाही.
वनश्री पुरस्कार विजेत्या खंडेराजुरी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व शेजारी असणारे दंडोबा व गिरलिंगाची पर्वतरांग यामुळे नैसर्गिक अधिवासात लांडगा, कोल्हा, तरस यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र गौण खनिज उत्खनन रात्रंदिवस सुरू असल्याने त्यांच्या अस्तित्वात धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत यापुढे गौण खनिजे उत्खनन करू नये असा ठराव केला आहे.

68
5721 views
  
1 shares